पाण्याचा घोट ठरला अखेरचा, प्रसिध्द कलाकाराचा हृदयाद्रावक मृत्यू; अभिनय क्षेत्रात शोककळा

मुंबई | साल २०२२ हे वर्ष मराठी कलाकारासाठी वाईट वर्ष ठरत आहे. कारण यंदा अनेक कलाकारांचा मृत्यू झाला आहे. मराठी विश्वातील प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले. तसेच यंदा अनेक कलाकारांनी आत्महत्या आणि अपघाताने या जगाचा निरोप घेतला. अशात एक प्रसिद्ध कवियित्री आणि लेखिका देखील अनंतात विलिन झाल्या आहेत.

त्यांच्या निधनाने सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरले आहे. माधुरी गयावळ यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने अनेकांच्या मनाला चटका लागला आहे. अगदी होत्याच नव्हतं झालं असं त्यांच्या निधनावर म्हणावं लागेल. कारण लाईव्ह कार्यक्रम सुरू असताना त्या सगळ्यांना सोडून खूप दूर गेल्या.

माधुरी या एक उत्तम लेखिका, कवियेत्री आणि चित्रकार होत्या. आम्ही प्रसिद्ध लेखिका या संस्थेच्या वतीने एका काव्य संमेलनाचे आयोजन केले गेले होते. इथे त्या सूत्रसंचालन करत होत्या. हे काव्य संमेलन ऑनलाईन होते. त्यामुळे माधुरी यांनी आपल्या घरून यात सहभाग घेतला होता. यात त्यांना सूत्रसंचालन करण्याचे काम सोपवले होते.

कार्यक्रम त्यांनी खूप छान पद्धतीने सुरू केला. नंतर काही मंडळींनी आपल्या कविता सादर केल्या. दरम्यान पुन्हा एकदा त्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव घेत होत्या तेव्हा त्यांना खोकला आला. त्यांचा खोकला थांबत नव्हता म्हणून त्यातील एका महिलेने त्यांना पाणी पिऊन येण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्या पाणी पियायला किचनमध्ये आल्या तिथेच बेशुद्ध झाल्या.

यावेळी घरच्यांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित केले. कार्यक्रमातील लोक त्यांची वाट पाहत होते. मात्र बराच वेळ त्या आल्या नाहीत म्हणून एका व्यक्तीने त्यांच्या घरी फोन केला तेव्हा त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. यामुळे क्षणात होत्याच नव्हतं झालं असं म्हणत कार्यक्रमातील सर्व मंडळींनी हळहळ व्यक्त केली.

माधुरी यांचा मनांगण हा एक प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. आता त्याच्या निधनानंतर कुटुंबात पती, मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने त्यांचे संपूर्ण कुटुंबीय शोक व्यक्त करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *