काळजाचा थरकाप उडवणारी घटना; रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात, अन् पुढे जे घडलं…

बुलढाणा | गर्दी असो अथवा नसो वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. थोडी देखील हलगर्जी केली तरी भीषण अपघात होत असतात. अशात बुलढाण्यात देखील असाच एक भीषण अपघात झाला आहे. यात एका दुचाकीने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा दुसऱ्या दिशेला फेकली गेली आहे. तसेच दोन दुचाकी स्वार यात गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच शुकशुकाट पसरला आहे.

बुलढाण्यातील दिपाली नगर खामगाव जवळ हा चित्तथरारक अपघात झाला. या अपघातात दोन व्यक्ती खूप जखमी झाल्या आहे. यात रिक्षा चालक आणि दुचाकी एकत्र धडकल्याने हा अपघात झाला आहे. सदर घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची सीसीटीव्ही क्लिप सध्या समोर आली आहे.

ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यात दिसत आहे की, एक रिक्षा दोन महिला प्रवासी घेऊन समोर जात आहे. रस्त्यावर जास्त वर्दळ नसल्याने त्या रिक्षा चालकाने आपली रिक्षा यू टर्न घेतली आहे. यू टर्न घेत असतानाच समोरून एक दुचाकी प्रचंड वेगात आली. त्यानंतर दुचाकी जोरात रिक्षाला धडकली. दुचाकीचा वेग प्रचंड होता. त्यामुळे रिक्षा अगदी दुसरीकडे फेकली गेली.

यात रिक्षा चालक आणि त्यातील प्रवासी सुखरूप आहेत. मात्र दुचाकी स्वार जागीच खाली पडले. यावेळी पळून न जाता रिक्षा चालकाने त्या दोघांना उचलले. तसेच इतर व्यक्ती देखील त्यांच्या मदतीला आले. पोलिसांना घटनेची माहिती देत दोन दुचाकी स्वरांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *