अभिनेता सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीच निधन

मनोरंजन | बॉलिवूड विश्वात काही दिवसांपासून कलाकारांच्या निधनाची वाईट घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी दिवंगत कलाकार राजू श्रीवास्तव यांचं हृदय विकाराच्या झटक्यान 30 सप्टेंबरमध्ये जिम करत असताना निधन झालं. कलाकार सागर पांडे यांचही आकस्मिक निधन झाल. सागर पांडे हा अभिनेता सलमान खान याचा डबल रोल भूमिका करायचा. त्यांनी बॉडीगार्डमध्ये सलमानच्या भूमिकेत होता.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा डुप्लिकेट प्रशांत वाल्डे याने त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. प्रशांतने सांगितले की, सागर जीममध्ये व्यायाम करत असताना अचानक तो कोसळला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आल. सागरने अभिनेता सलमान खानच्या अनेक चित्रपटांमध्ये डबल रोलसाठी काम केलं आहे.

कोणत्या चित्रपटात डबल रोल म्हणून केलं काम ? :
आपण काही चित्रपटात हुबेहूब अभिनेत्याप्रमाण दुसरा अभिनेता पाहतो. याच कारण म्हणजे डबल रोल होय. हुबेहूब अभिनेता सारखाच दुसरा अभिनेता तयार करण हे आधीपासूनच्या चित्रपटात पाहायला मिळत. याच प्रमाणे अभिनेता सलमान खानच्या डबल रोलसाठी सागर पांडे काम करायचा त्यान दबंग , दबंग 2, दबंग 3, तसेच बॉडीगार्ड, ट्युबलाईट यांसारख्या सिनेमात डबल रोलचं त्यानी काम केलं होत.

दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळ स्टेज शो आणि डबल रोलसाठी प्रसिद्ध असलेला कलाकर सागर पांडेवर आर्थिक ताणतणाव आला. यामुळं तो खूपच चिंतेत असायचा. त्याला पाच भाऊ आहेत त्यांचा सर्व खर्च त्यालाच करावा लागतो. त्याला सलमान प्रमाणे अभिनेता व्हायचं होत. तो उत्तर प्रदेशहून मुंबईमध्ये आला. बरेच दिवस त्याला काम मिळालं नाही. म्हणून तो सलमानचा बॉडी डबल म्हणून काम करू लागला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *