सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारावर कोसळला आहे दुःखाचा डोंगर

दिल्ली | साल २००५ मध्ये आलेल्या द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमातून अनेक विनोदी कलाकार या सिनेसृष्टीला मिळाले. त्यातीलच एक राजू श्रीवास्तव. राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीविषयी अधिक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी वाचून अनेक जण स्तब्ध झाले आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या वरती गेल्या दहा दिवसांपासून डॉक्टर शर्तीचे उपचार करत आहेत. १० ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेव्हापासून त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने डॉक्टरांची एक संपूर्ण टीम उपचार करत आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावे असे सर्वजण प्रार्थना करत आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची काळजी व्यक्त करत त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या कारकीर्दीत विनोदी अभिनयातून प्रचंड प्रसिद्ध मिळवली आहे. शक्तिमान सारख्या बहुचर्चित टीव्ही शोमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. या शोमध्ये धुरंदर सिंग हे पात्र ते साकारत होते. त्याचबरोबर त्यांनी कॉमेडी की सर्कस, कॉमेडी का महा मुकाबला, लाफ इंडिया लाफ, कॉमेडी नाईट्स विथ कपिल अशा अनेक कॉमेडी शो मध्ये प्रेक्षकांना पोटदुखीपर्यंत हसवले आहे.

आपल्या अभिनयाच्या कारकीर्द त्यांना १९८८ रोजी तेजाब या चित्रपटातून पहिल्यांदाच त्यांना मोठ्या पडद्याव झळकण्याची संधी मिळाली. मैने प्यार किया, जिगर, मै प्रेम की दिवानी हु, बिग ब्रदर, बॉम्बे टू गोवा, टॉयलेट एक प्रेम कथा अशा सर्व सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या विनोदाची शैली दाखवली आहे. कायमच सर्वांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव आता प्रत्येक चाहत्याच्या डोळ्यात आसवं आणत आहेत.

राजू श्रीवास्तव यांना एम्स रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची अँजिओग्राफी ही सर्जरी केली गेली. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवले गेले. मात्र त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नसल्याने गेल्या आठवड्यात शुक्रवारी त्यांचा एमआरआय करण्यात आला. यावेळी त्यांच्या मेंदूला ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने त्यांच्या मेंदूमध्ये काळे ठिपके दिसले. याच संदर्भात आता डॉक्टरांनी एक मोठी घोषणा केलेली.

डॉक्टरांनी केलेल्या घोषणेमुळे आता अनेकांची आशा कमी होत आहे. राजू श्रीवास्तव यांचे प्रवक्ते आणि प्रमुख सल्लागार अजित सक्सेना यांनी सांगितले की, राजू यांच्या प्रकृतीत अजिबात सुधारणा होत नाहीये. एमआरआय केल्यानंतर आलेल्या रिपोर्ट वरती देखील औषध उपचार करण्यात आले. मात्र आता डॉक्टरांनी त्यांचा ब्रेनडेड झाल्याचे घोषित केले आहे. यामुळे कुटुंबीयांवर मोठी दुःखाची लाट उसळून आली आहे. सर्वजण हवालदील झाले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *