डिस्को डान्सर’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरी कोसळला दुःखाचा डोंगर….

मुंबई| मिथुन चक्रवर्ती यांचा ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट त्या काळी खूप गाजला होता. चित्रपट आणि त्यातील कलाकार खूप प्रसिद्ध झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन बी सुभाष यांनी केले होते. अशात आता त्यांच्या घरी दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जवळील एका व्यक्तीचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या दुःखाला पारावार उरला नाहीये.

बी सुभाष यांच्या पत्नी तिलोत्तीम्मा यांचे सोमवारी रात्री निधन झाले. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या सहा वर्षांपासून त्या एका गंभीर आजाराने पीडित होत्या. या आजाराने त्या खूप त्रस्त झाल्या होत्या. उपचार आणि सर्व मेहनत करून त्यांच्या पतीने त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

चित्रपट निर्माते आणि लेखक बी सुभाष यांच्या पत्नी तिलोत्तीम्मावर गेल्या पाच वर्षांपासून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच अशी बातमी समोर आली होती की, बी सुभाष यांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही. ते या संकटाशी झुंजत आहेत.

तर आता लगेचच त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या बातमीने चाहते देखील दुःखी झाले आहेत.
त्यांच्या पत्नीला फुफ्फुसाचा आणि किडनीचा एक गंभीर आजार झाला होता. सहा वर्षांपूर्वी ही गोष्ट त्यांना समजली होती. गेल्या तीन वर्षांपासून त्यांची प्रकृती अधिक बिघडत होती. जवळ असलेला सर्व पैसा बी सुभाष यांनी पत्नीच्या उपचारात वापरला.

बी सुभाष हे ८० च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. कोरोनाच्या काळात त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आले. बी सुभाष हे आता ७८ वर्षांचे आहेत. त्यानं दोन मुली देखील आहेत. आपल्या कारिर्दीत त्यांनी बॉलिवूडमध्ये १८ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. बी सुभाष यांनी एका मुलाखतीत आपल्या पत्नी विषयी सांगितले होते की, “पत्नीच्या किडनीच्या आजाराची माहिती मिळताच मी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या आणि तिला फुफ्फुसाचा त्रास असल्याचे समोर आले. त्यामुळे किडनी प्रत्यारोपण होऊ शकले नाही.”

आपल्या पत्नीची अशी अवस्था पाहून ते खूप चिंतेत होते. तसेच जवळ असलेला सर्व पैसा संपला होता. मात्र त्यांना आपल्या पत्नीला काही करून वाचवायचे होते. त्यामुळे त्यांनी मिथुन चक्रवर्ती आणि सलमान खान यांच्याकडे मदत मागितली. या दोन्ही कलाकारांनी लगेचच त्यांना मदत देखील केली. या दरम्यान त्यांची प्रकृती थोडी ठीक झाली होती. मात्र आजार संपला नव्हता. त्यामुळे सोमवारी त्यांचे निधन झाले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *