खूप सारं प्रेम आणि…”, समांथाच्या आजाराबद्दल समजताच नागा चैतन्याच्या भावाने केलेली कमेंट चर्चेत

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूला मायोसायटिस या गंभीर आजाराचं निदान झालं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रुग्णालयातील फोटो शेअर करत याबाबत तिच्या चाहत्यांना माहिती दिली. समांथाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही तिच्यासाठी काळजी व्यक्त केली आहे.

 

समांथाने तिच्या पोस्टमध्ये “‘यशोदा’ ट्रेलरला तुम्ही खूप प्रेम दिलं. हेच प्रेम आणि कनेक्शन मी तुमच्या सर्वांशी शेअर करते. तुमचं सर्वांच प्रेमच मला आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांवर मात करण्याचं बळ देतं. काही महिन्यांपूर्वीच मला मायोसायटिस नावाच्या एका ऑटोइम्यून आजाराचं निदान झालं आहे. मला सुरुवातीला वाटलं होतं की हा आजार लवकरच बरा होईल आणि मी लवकर ठीक होईन, मला जास्त त्रासही होणार नाही. पण आता अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. मला हळूहळू जाणवतंय की, नेहमीच मी मजबूत आहे खंबीर आहे असं दाखवण्याची काहीच गरज नाही. ही गोष्ट स्वीकारणं एखाद्या संघर्षापेक्षा कमी नाही. डॉक्टरांना विश्वास आहे की मी लवकरच ठीक होईन”, असं म्हटलं होतं.
समांथाच्या या पोस्टवर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अखिल अक्कीनेनी यानेही कमेंट केली आहे. “तुला खूप सारं प्रेम आणि बळ, प्रिय सॅम”, असं त्याने कमेंट करत म्हटलं आहे. अखिल अक्कीनेनी हा सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांचा मुलगा आणि समांथाचा पूर्वाश्रमीचा पती नागाचैतन्यचा भाऊ आहे. त्याच्या या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 

समांथा आणि नागाचैतन्य चार वर्षांच्या सुखी संसारानेतर २०२१मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांनाही धक्का बसला होता. घटस्फोट घेतल्यानंतरही ते अनेक दिवस चर्चेत होते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *