हृदयाला चटका लावणारी घटना! गावात रस्ता नसल्याने गरोदर महिलेला झोळीत टाकून नेल; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

नाशिक | आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र आजही अनेक ठिकाणी नागरिकांना थोड्या सुविधा देखील उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी आज देखील रस्ते, वीज आणि पाणी अशा समस्या आहेत. नागरिकांना यासाठी जीवावर उधार होऊन कामे करावी लागत आहेत.

एकीकडे शहरात विकास होत आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी रस्तावर खड्डे आहेत. अशात खेड्या पाड्यात अजूनही सुविधा उपलब्ध नाहीत. याची पुन्हा एकदा आठवण करून देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. व्हिडिओ पाहुन तुम्हाला देखील चिढ येईल. कारण एका गावात रस्ता नसल्याने एका गरोधर महिलेला झोळी करून नेले जात आहे.

सदर व्हिडीओ हा नाशिक येथील हत्तीपाडा गावातील आहे. इथे काही नागरिक ब्लँकेटची एक झोळी बनवून एका महिलेला दवाखान्यात घेऊन जात आहेत. गावात रस्ता नसल्याने त्यांना अशा पद्धतीने या महिलेला न्यावे लागत आहे. हा व्हिडिओ त्याच ग्रामस्थांनी शूट केला आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. प्रशासन कधी जागे होणार याची हे ग्रामस्थ वाट पाहत आहेत.

सोशल मीडियावर आता पर्यंत असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अशात हत्तीपाडा गावातील ग्रामस्थ खूप त्रस्त आहेत. कारण त्यांच्या गावात ठराविक सुविधा देखील नाहीत. ते सतत प्रशासनाला मदतीचे आवाहन करत आहेत. मात्र अजूनही त्यांच्या नशिबी सुविधा नाहीत.

या आधी देखील या गावात एका १७ वर्षीय तरुणीला सर्प दंश झाला होता. मात्र रस्ता नसल्याने तिला दवाखान्यात न्यायला उशीर झाला आणि तिचा मृत्यू झाला. तीन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. आता प्रशासन या व्हिडीओची पडताळणी करून सदर ग्रामस्थांना केव्हा मदत करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *