काळीज पिळवटून टाकणारी घटना! विजेच्या धक्क्याने ५ वर्षीय चिमुकल्याचे निधन; परिसरात शोककळा

औरंगाबाद | औरंगाबाद येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका पाच वर्षीय बाळाचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या शेजारी महावितरणची एक तार रस्त्यावर पडली होती. खेळत असताना चिमुकला अनस तिथे गेला. त्यावेळी नकळत त्याचा पाय त्या तारेवर पडला. त्याचा पाय तारेवर पडताच त्याला विजेचा मोठा झटका बसला. यात त्याचा जीव तरफडू लागला. यावेळी रस्त्यावर असलेल्या इतर व्यक्तींनी लगेच आरडाओरडा केला. यात या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही घटना बिडकिन तालुक्यातील सोमपुरी गावात घडली आहे. अनस इलियास शेख असं मृत बाळाचं नाव आहे. त्याच्या वडिलांना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला आहे. आपलं ५ वर्षांचं बाळ आपल्यात नाही हा विचार त्याला सहन होत नाहीये. एक बाप आपल्या मुलाला अग्नी द्यावी लागेल असा कधीच विचार करत नाही. मात्र या पित्यवर हा दुःखद प्रसंग ओढवल्याने त्याने रडून मोठा आक्रोश केला आहे. या बाळाची आई देखील टाहो फोडून रडत आहे. थोडावेळ कामामुळे बाळाकडे पाहता आले नाही त्यामुळे होत्याचे नव्हते झाले. यामुळे ती देखील खूप रडत आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, वीज वितरण कंपनीची विजेची तार रस्त्यावर पडली होती. यावेळी अनसची आई कामात होती. अनस खेळत खेळत बाहेर आला. नंतर तो रस्त्यावर आला तेव्हा त्याचा त्या विजेच्या तारेवर पाय पडला. यावेळी गावकऱ्यांनी त्याला तारे पासून वेगळे केले आणि दवाखान्यात नेले. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.

अनस आता या जगात नाही. या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनी बाहेर गर्दी केली होती तसेच आक्रोश व्यक्त करत होते. बिडकीन पोलीस ठाण्यात या घटने विरोधात तक्रार देखील नोंदवण्यात आली. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांना समजावून शांत गेले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *