लग्नाच्या एक दिवस आधी नवरी मुलीच्या वडिलांचे झाले निधन; प्रसंग वाचून डोळ्यात पाणी येईल

नाशिक | प्रत्येक मुलगी ही तिच्या पप्पांची परी असते. कारण प्रत्येक वडील आपल्या मुलीवर सगळ्यात जास्त प्रेम करत असतात. आपल्या मुलीच्या आयुष्यातील ते एक रिअल हिरो असतात. त्यामुळेच मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा सर्व जबाबदारी पार पाडून बाप एका कोपऱ्यात आणि सध्या शर्टात बसलेला दिसतो. बाप लेकीचे नाते नेहमीच निराळे आणि प्रेमळ राहिले आहे. मात्र एका ठिकाणी याच नात्यावर दुःखाची छाया आली आहे.

मुलगी अगदी दुसऱ्या दिवशी सासरी निघालेली असते मात्र त्याच आधी त्या मुलीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे दुःख पचवणे तिच्यासाठी खूप कठीण जाणार आहे. मुलीचे वडील अशोक हे वेरावल येथे एका औषध व्यापारी होते. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली होती. मात्र त्यांना मुलं होतं नव्हतं. त्यावेळी त्यांनी एका बाळाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी आपल्याच भावाच्या एका मुलीला दत्तक घेतलं.

दत्तक घेतलेल्या मुलीचं नाव आयुषी आहे. लहापणापासूनच आयुषी अशोक यांच्या घरी आई आणि बाबांबरोबर सुखी आयुष्य जगत होती. तिला हवं नको ते सर्व सुख तिच्या पायाशी लोटांगण घालत होतं. अशोक यांनी आयुषीला शालेय तसेच नंतर महाविद्यालयीन शिक्षण देखील दिलं. एका बापाने आपल्या मुलीसाठी जे जे केलं पाहिजे ते ते त्यांनी केलं. नंतर आयुषीचं लग्न ठरलं.

घरी संपूर्ण आनंद आणि उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. त्यामुळे सगळे खुश होते. ती हातावर मेहेंदी लावून देखील तयार होती. लग्नाची सगळी तयारी झाली होती. मात्र काळाने या कुटुंबावर घाला घातला. अशोक यांची तब्येच अचानक बिघडली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. राजकोट येथे सर्व कुटुंबीय त्यांना रुग्णवाहिकेतून घेऊन चालले होते. यावेळी गोंडजवळ पोहोचले असता मोठा अनर्थ झाला.

अशोक यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. ज्यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासले तेव्हा त्यांना मृत घोषित केले. या घटनेने आयुषी पूर्णतः खचून गेली आहे. पदरी मुलं नसल्याने दत्तक घेतलेल्या मुलीचे या बापाला नीट कन्यादान देखील करता आले नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबीय आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *