भर गर्दीत 35 वर्षीय महिला पडली रक्ताच्या थारोळ्यात; पोलिसही हादरले

गोंदिया | कायदा आणि नागरी सुव्यवस्था हे अनेक ठिकाणी पायदळी तुडवत विविध प्रकारचे गुन्हे दिवसा ढवळ्या घडत आहेत. यात अनेकजण आपले जीव गमावत आहेत. गोंदिया जिल्हा देखील अशाच एका घटनेने हादरून गेला आहे.

इथे भर गर्दीच्या ठिकाणी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. गोंदिया येथील देवरी शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच शहरातील अगदी गर्दी असताना काल सायंकाळी एका ३५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं सगळीकडे भीतीची लाट पसरली आहे.

देवरी शहरात नागरी सुव्यवस्था आणि सुरक्षा या फक्त नावाला आहेत असे म्हटले जात आहे. येथील नागरिक आता संतप्त झाले असून खूप भयभीत आहेत. कारण एवढी गर्दी असलेल्या ठिकाणी कोणीही येऊन एका महिलेची हत्या करतो ही बाब खरोखर फार गंभीर आहे. या घटनेचा या शहरातील नागरिक निषेध व्यक्त करत आहेत. तसेच आरोपीला शोधून त्याला जेल बंद करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

या घटनेत ३५ वर्षीय महिला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे नाव शशिकला साखरे असे आहे. सदर महिलेची त्या इसमांबरोबर अजिबात ओळख नव्हती. मात्र तरी देखील त्यांनी तिची हत्या केली. ही हत्या चोरी मुळे केली गेली आहे असे सांगण्यात आले. कारण महिलेची हत्या करून तिच्या अंगावरील सर्व दागिने घेऊन ते चोर आणि खुनी लंपास झाले आहेत.

ही घटना घडल्याने त्या परिसरातील वातावरण फार तणावात आहे. यावेळी अनेक बघ्यांनी गर्दी केली होती. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी इथे धाव घेतली. सदर घटनेचा पंचनामा करून शोध पथक कामाला लागले आहे. यावेळी पोलिसांनी उपस्थित सर्व व्यक्तींची चौकशी सुरू केली. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रथमता तर सदर घटना ही चोरीमुळे घडली असल्याचे दिसत आहे.

महिलेची ओळख पटताच कुटुंबीयांना याची माहिती दिली गेली. यावेळी महिलेच्या घरातील सर्व व्यक्ती इथे दाखल झाले. महिलेच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यांचा आक्रोश पाहून अनेकणांच्या डोळ्यात पाणी आले.

त्यामुळे सर्व जण आता त्या आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांना जेल बंद करा आणि फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत आहेत. काहीच दोश नाही. भांडण नाही तरी देखील एका महिलेला जीव गमवावा लागला यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *