दुदैवी! हनिमूनला जात असताना भीषण अपघात, नव विवाहित जोडप्याचा मृ’त्यू

बिकानेर | लग्न म्हणजे प्रत्येक मुलीसाठी एक नवीन जग असतं. आपल्या आयुष्यातील एक नवी कोरी सुरुवात असते. नवीन नाती, नवीन घर सर्व काही नवीन असते. यावेळी प्रत्येक जोडपं आपल्या लग्नासाठी वेगवेगळी स्वप्न बघत असतं. यात जर लव मॅरेज असेल तर मग याची गोष्टच वेगळी. कारण मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात. त्यांना एकत्र आयुष्य घालवायचे असते. त्यासाठी ते खूप मेहनत घेतात. मात्र एका नविवाहित जोडप्याचा संसार अगदी भयानक पद्धतीने तुटला आहे.

यात त्या दोघांनी पाहिलेली सर्व स्वप्न क्षणात तुटून गेली आहेत. हनिमून हा प्रत्येक जोडप्याचा आनंदाचा क्षण असतो. हा क्षण दोघेही भरभरून आनंदाने जगतात. मात्र हनिमुनच्या वाटेवरच फक्त २५ दिवसांच्या जोडप्याचा संसार चिरडला गेला आहे. एका नवविवाहित दांपत्याला हनिमूनला जात असताना मृत्यूने कवटाळले आहे. त्यामुळे संसार सुरू होण्याआधीच सर्व काही उध्वस्त झालं आहे. या घटनेने दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

बिकानेर रोड जवळील भोजूरस कुंडियाजवळ एक भीषण अपघात घडला आहे. यात कारमध्ये असलेल्या जोडप्याचा मृत्यू झाला आहे. जेव्हा अपघात झाला तेव्हा दोघेही गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन या दोघांना रुग्णालयात दाखल केले.

या दोघांवर नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले मात्र अपघात भीषण असल्याने त्यांना खूप मार लागला होता. त्यामळे त्यांना बीकानेर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. यावेळी उपचार सुरू असतानाच या पती पत्नीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्या दोघांचे शव शासकीय रुग्णालयात आणले गेले. कुटुंबीयांना याची माहिती देत सर्व कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्या दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन केले गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे जोडपं राजस्थानला जातं होतं यावेळी बिकानेर गावाच्या दिशेने भोजुरस बसस्थानकाजवळ त्यांची कार पोहचली होती. त्यावेळी समोरून एका ट्रकची त्यांच्या कारला जोरात धडक लागली. या अपघातात दोघेही मृत पावले आहेत. कुटुंबीयांनी त्या ट्रक चालका विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

मृत पती विशाल कुमार (२५) पत्नी नेहा कुमार (२४) या दोघांच्या लग्नाला फक्त २५ दिवस झाले होते. मयत विशालचा भाऊ ऋषिपाल याने सांगितले की, माझा भाऊ आणि त्याची पत्नी कार मधून राजस्थानला हनिमूनसाठी जात होते. वाटेत त्यांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. ऋषिपालने ट्रक चालका विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *