८ महिन्याच्या बाळाने अचानक दूध पिण केलं बंद; एक्सरे काढल्यावर जे दिसलं ते पाहून डॉक्टर हादरले

बारामती | लहापण मुलांना डोळ्यात अगदी तेल घालून जपावे लागते. जरा जरी नजर चुकली तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. बाळ जर दूध पीत नसेल रडत असेल तर आपल्याला त्याचे पोट भरले आहे असे वाटते. किंवा त्याच्या पोटात गॅस झाला असावा असे आपण समजतो.

मात्र प्रत्येक वेळी हेच कारण असू शकत नाही. बाळाने दूध पिणे सोडले अथवा त्याच्यात काही बारीक आणि वेगळ्या हालचाली जाणवल्या तर याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण बारामती येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

ते ८ महिन्याच बाळ आपल्या आईच्या कुशीत दूध पित होतं. दूध पीत असताना अचानक त्याने दूध पुणे बंद केले. त्यामुळे घरचे मंडळी चिंतेत आले. त्यांनी बाळाला काही त्रास होतं आहे का याकडे लक्ष दिले. त्यावेळी त्यांना अधिक काळजी वाटली त्यामुळे त्यांनी बाळाला तातडीने रुग्णालयात नेले. यावेळी त्याला नजीकच्या बालरोगतजज्ञ रुग्णालयात हलविण्यात आले. इथे आल्यावर त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या गेल्या.

यावेळी डॉ. सौरव मुथा त्याच्यावर उपचार करत होते. त्यांनी त्याचे वेगवेगळे रिपोर्ट केले. मात्र बाळाला काय झाले समजत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याचा एक्सरे काढला. यावेळी एक्सरेमध्ये जे समजले ते पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

घरातील सर्व मंडळी हवालदिल झाली. त्या बाळाला दूध पीत असताना श्वास घेता येत नव्हता. कारण त्याने आपल्या आईच्या पायातील जोडवे गिळले होते. त्यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या. त्याने जोडावे गिळले त्यावेळी याची कुणालाच काहीच कल्पना नव्हती.

तसेच त्याच्या आईचे देखील या गोष्टीकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे त्या बाळाला डॉक्टरांनी निंबाळकर हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यास सांगितले. इथे आल्यावर डॉ. सौरभ निंबाळकर यांनी त्याला तपासले. त्यानंतर लगेचच ऑपरेशनची तयारी केली. त्यांनी दुर्बिणीच्या सहाय्याने बाळाच्या घशात अडकलेले जोडवे बाहेर काढले. यावेळी बाळाचे कुटुंबीय घाबरले होते. मात्र शस्त्रक्रिया सुखरूप पार पडली. बाळ आता सुखरूप आहे. तसेच ते आईचे दूध देखील पित आहे.

असाच प्रकार झारखंडमध्ये देखील घडला होता. इथे प्रिया कुमारी या ६ महिन्याच्या चिमुकलीने खेळत असताना एक प्लास्टिकचा बल्प गिळला होता. यावेळी तिने खेळत असताना प्लास्टिकचा ब्लप चुकून गिळून घेतला. जेव्हा तिला याचा त्रास झाला तेव्हा रडून तिने घर डोक्यावर घेतलं.

यावेळी कुटुंबीय घाबरले. त्यांनी तिच्या घश्यात प्लास्टिकचा बल्प आहे हे पाहिलं. त्यावेळी त्यांनी स्वतः तो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ते जमत नसल्याने त्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले. इथे तिच्यावर देखील दुर्बिणीच्या साहाय्याने उपचार करत बल्प काढला गेला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *