भीषण अपघातात ६ महिन्यांचे बाळ ठार; पुण्यात मन हेलावणारी घटना

पुणे | पुणे शहरातील राजगुरुनगर या ठिकाणी एक काळीज हेलावणारी घटना घडली आहे. पुण्यातील राजगुरूनगर येथे ट्रॅक्टरची एका दुचाकी वाहनाला धडक लागली. त्या अपघातात सहा महिन्यांच बाळ आईच्याकडेवर होत. ते त्या अपघातात ठार झालं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अपघात घडल्यानंतर उपस्थित नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. ट्रॅक्टर चालक मात्र काही घडलेच नाही अशा रुबाबात तिथून निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

लहान बाळ आजारी असल्यानं त्याला आई आणि बाबा दवाखान्यात नेत होते. त्यावेळी ते तिघेही गाडीवर बसलेले होते. अशावेळी मागून एक भरधाव वेगात ट्रॅक्टर आला आणि दुचाकीला ठोकर दिली. अशावेळी तिच्या हातातून थेट बाळ ट्रॅक्टरच्या चाकाखाली गेलं. हे आईच्या डोळ्यासमोर झालं. यामुळे मुलाच्या आईन हंबरडा फोडला. घटनेनंतर तो ट्रॅक्टर ड्रायव्हर तसाच पुढं निघून गेला.

घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी बाळ पाहताच हळहळ व्यक्त केली आणि दुचाकी बाजूला घेऊन त्या बाळाच्या आई, वडिलांना धीर दिला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा अपघात राजगुरूनगर वाडा रोडवर घडला आहे. संबंधित ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *