प्रसिध्द अभिनेत्रीला बायको बनण्यासाठी २५ लाखाची ऑफर; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

दिल्ली | मनोरंजन विश्वात अनेक अभिनेत्रींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना समोर येत आहे. यामध्ये महिलांची होणारी घुसमट खूप वाढली आहे. अभिनेत्री अभिनय करून काम करून स्वतः चा उदरनिर्वाह करत असतात. मात्र जर कुणी त्यांच्याकडून काम काढून घेतल आणि त्यांना पगारी पत्नी होण्याची ऑफर दिली तर! खरोखर ही बाब खूप लज्जास्पद आहे. मात्र एका अभिनेत्रीला या घटनेला सामोरे जावे लागले आहे.

अभिनेत्री नीतू चंद्रा हिने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काही चित्रपटांत काम केले आहे. तिचा अभिनय उत्तम आहे. मात्र आता तिच्याकडे एकही काम नाही. नुकतीच तिने एका मध्यामाला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिची सद्य परिस्थितीत तिने सांगितली. ती म्हणाली की, “मी मोठ मोठे पुरस्कार मिळालेल्या अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. पण आता मला कोणीही चित्रपटात काम देत नाही. माझी आर्थिक परिस्थिती सध्या खूप बिकट आहे मला काम करण्याची इच्छा आहे. मात्र मला कोणी काम द्यायला तयार नाही.”

पुढे मोठा गौप्यस्फोट करत ती म्हणाली की, ” एका उद्योजकाने मला लग्नाची ऑफर दिली आहे. मात्र यामध्ये तो म्हणाला आहे की, मी तुला महिन्याला २५ लाख रुपये देतो. माझ्याशी लग्न कर आणि पेड बायको म्हणून माझ्या बरोबर राहा.” अभिनेत्रीने सांगितलेलं हे सर्व काही खूप घृणास्पद आहे. चाहते आता तिच्या विषयी खूप काळजी व्यक्त करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *