२८ वर्षीय तरुणाचा पाण्याने केला घात, तीन दिवस झाले अजूनही शव बेपत्ता……!

पुणे | पावसाळा सुरू झाला की, अनेक पर्यटक पावसाचा आणि भरलेल्या धबधब्याचा सुंदर अनुभव घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तुम्ही देखील पावसाळी सहलीचा प्लॅन करत असाल तर ही बातमी खास तुमच्या साठीच आहे. कारण मजा, मस्ती आणि मस्करीची कधी आणि कशी कुस्करी होईल याचा कुणालाच काही नेम नाही. तामिळनाडूच्या कोडाईकनाल जिल्ह्यामध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

एका २८ वर्षीय तरुण पाण्यात वाहून गेला आहे. हा तरुण धबधब्याच्या अगदी शेजारी उभा आहे. त्याचा मित्र त्याचा फोटो आणि व्हिडिओ घेत आहे. यावेळी तोल जाऊन हा तरुण पाण्यात पडतो. त्यानंतर अजूनही तो बेपत्ता आहे. पोलीस तसेच सुरक्षा रक्षक त्याचा गेल्या ३ दिवसांपासून शोध घेत आहेत.

पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव अजय असे आहे. तो आपल्या मित्राबरोबर धबधब्याच्या ठिकाणी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी गेला होता. सदर घटना घडली तेव्हा त्याचा मित्र अजयचा व्हिडिओ शूट करत होता. सदर व्हिडिओ हा ३ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. त्यानंतर आता हा व्हिडिओ खूप व्हायरल होतं आहे.

अजय सुरुवातीला खडक असेल्या ठिकाणाहून पाण्याच्या ठिकाणी पायी चालत जाताना दिसत आहे. फोनमध्ये व्हिडिओ अधिक छान यावा म्हणून तो पाण्याच्या आणखीन जवळ जात आहे. तो आपल्या मित्राला देखील हातवारे करून विचारले आहे. फोटो छान यावा म्हणून तो आणखीन पुढे जातो. एक पोज देतो. तितक्यात त्याचा तोल जातो. तो आधी दगडांवर पडतो. मात्र तिथे शेवाळ असल्याने त्याला स्वतःला सावरता येत नाही. त्यामुळे तो पाण्यात पडतो.

तो जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा त्याचा मित्र जिवाच्या आकांताने ‘मीचा’ अशी हाक मारतो. मात्र त्याची ही हाक अजय पर्यंत पोहचली असली तरी देखील पाण्याच्या प्रवाहात अजय वाहून गेला आहे. त्याच्या मित्राने नंतर लगेचच आरडाओरडा करून बाकीच्या लोकांना तिथे बोलवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील तिथे हजर झाले. अजयला शोधण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. मात्र तो कुठे आहे? त्याचा मृत्यू झालाय का? या बद्दल काहीच समजू शकले नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *