सैराटच्या आर्चीचा झाला साखरपुडा ?

 

मेकअप’ चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलिज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून चित्रपटाची आणि रिंकूला नव्या रुपात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नुकताच तिचा साखरपुड्यातील फोटो व्हायरल होतोय पाहा नक्की काय आहे त्याची कहाणी

 

मुंबई : ‘आर्ची’ हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्य़ात पोहोचलं आहे. ‘सैराट’ या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला झिंगाट केलं. यामधील आर्चीची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भावली. पहिल्याच सुपरहिट चित्रपटाने आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर ही रिंकू चित्रपटातून झळकली. काही दिवासांपूर्वी तीने ‘धडक’ फेम जान्हवी कपूरची भेट घेतली आणि चर्चेचा विषय ठरली. रिंकूचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मेकअप’ असं त्या चित्रपटाचं नाव आहे.

 

मेकअप’ चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलिज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून चित्रपटाची आणि रिंकूला नव्या रुपात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. रिंकूसोबत य़ा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता चिन्मय उदगीकर झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये रिंकू दोन अगदी वेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. साध्या मुलीमधला तिचा रोल आणि मग मॉर्डन रिंकूच्या लुकने सिनेमामध्ये ट्विस्ट आणला आहे. हा चित्रपट कॉमेडीची मेजवानी असणार आहे. या चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्या गाण्यामध्ये रिंकू आणि चिन्मय या दोघांचा साखरपूडा झाल्याचे दिसते.
यामध्ये रिंकू “पूर्वी” आणि चिन्मय ”नील” या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. पूर्वी आणि नील यांच्या साखरपूड्यांचं हे गाणं एकदा बघाच. साखरपूड्यावर आधारीत हे गाणं खूप छान असून प्रत्येकालाच ताल धरण्यास भाग पाडणारं आहे. प्रत्येक व्य़क्तीला आपलसं वाटणारं हे गाणं शाल्मली खोलगडेने गायले असून ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. तर, गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे आहेत आणि विठ्ठल पाटील यांचे नृत्य दिग्दर्शन लाभले आहे.

चित्रप़टाचं दिग्दर्शन आणि लेखन गणेश पंडीत यांनी केलं आहे. तर, दिपक मुकुट, हिरेन गडा, निरज बर्मन, अमित सिंग आणि बी. राव यांनी केलं आहे. चिन्मय आणि रिंकू ही जोडी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार आहे. सैराटशिवाय रिंकू मानसू मल्लिगे, नूर जहान, कागर या चित्रपटातून झळकली आहे. शिवाय ती ताहिर शब्बीरच्या वेब सिरिजमध्येही दिसणार आहे. ‘100’ असं या सिरिजचं नाव असून ती हॉटस्टारवर रिलिज होणार आहे

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *