रात्रीचा मी त्या फळीवर…..”, प्रसाद ओकने व्यक्त केला त्याचा भाऊक संघर्ष…

मुंबई| अभिनय क्षेत्रात नाव कमवत असताना अनेक कलाकारांना सुरुवातीला मोठ्या संकटाना समोर जावे लागते. पदरी असलेली प्रसिध्दी यश या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी सगळेच मेहनत घेतात. मराठी सिनेसृष्टीत प्रसाद ओक या अभिनेत्याने आज यशाचं मोठं शिखर गाठलं आहे. मात्र त्याचा आता पर्यंतचा प्रवास तितकासा सोपा नव्हता.

आज त्याच्या दारी सुखं नांदत आहे. मात्र सुरुवातीच्या काळात त्याला कित्येक रात्र रस्त्यावर काढाव्या लागल्या आहेत. या बाबतचा खुलासा त्याने स्वतः केला आहे. गेल्या शनिवारी प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी हे दोन्ही कलाकार कोण होणार करोडपती या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी प्रसादने त्याच्या आयुष्यातील एक दुःखद प्रसंग सांगितला.

काही दिवसांपूर्वीच “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे” हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला भरभरून यश मिळाले. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका प्रसादने साकारली. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक झाले. आता त्याला याच चित्रपटाला अनुसरून एक प्रश्न विचारण्यात आला.

कोण होणार करोडपती या कार्यक्रमात त्याला विचारण्यात आले की, धर्मवीर आधी त्या फळीवर झोपणाऱ्या प्रसादला हे यश पाहून कसं वाटलं? त्यावेळी तो म्हणाला की, ” मी मुंबईमध्ये सुरुवातीला पेन गेस्ट म्हणून एका महिलेकडे राहत होतो. त्यावेळी मला तिला द्यायला पैसे नव्हते त्यामुळे तिने मला घरातून बाहेर काढलं होत. त्यावेळी दादर मधील चित्रा टॉकीज बाहेर एका बाकड्यावर मी झोपलो. अशात तिथे असे दिवस काढत असताना. मी काय करतोय, रस्त्यावर झोपाव लागत आहे आणि अंगावर साधं पांघरून नाही. असे कोणते प्रश्न मनात येण्या ऐवजी मला वाटतं होतं की त्या चित्रा टॉकीज बाहेर आपलं मोठं पोस्टर कधी लागणार.”

त्याचा हा संघर्षाचा टप्पा ऐकून अनेक चाहते भावूक झाले. तसेच हे सर्व सांगत असताना तो देखील थोडा भावूक झाला होता. मात्र प्रसादने आजवर मिळवलेले यश हे त्याने स्वतः च्या हिमतीने मिळवले आहे. त्याचा अभिनय नेहमीच कौतुकास्पद राहिला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार २०२२ ने देखील सन्मानित करण्यात आले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *