मोठी अपडेट! राजू श्रीवास्तव यांचा ब्रेन झाला डेड; हृदय देखील करत नाही नीट काम…. 

मुंबई | १० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी ते जिममध्ये ट्रेडमिलवर व्यायाम करत होते. ते हृदय विकाराचा झटका आल्याने अचानक खाली आदळले. तेव्हापासून आज ९ दिवस झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आता त्यांच्या प्रकृती विषयी अधिक चिंता वाढवणारी वाईट बातमी समोर आली आहे.

राजू यांना १० ऑगस्ट रोजी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल केले गेले. त्यानंतर त्यांच्यावर मोठी अँजिओग्राफी सर्जरी केली गेली. यावेळी त्यांच्या हृदयात १००% ब्लॉकेज असल्याचे त्यांच्या भावाने सांगितले होते. ही सर्जरी पूर्ण झाल्यावर त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर ठेवले गेले.

नंतर ३ दिवसांनी त्यांच्या पायाच्या हालचाली झाल्या. त्यामुळे हा सकारात्मक बदल असल्याचे डॉक्टर म्हणाले. मात्र त्या नंतर त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. पुढे त्यांचा एमआरआय काढण्याचा निर्णय घेतला गेला. यावेळी त्यांच्या मेंदूची नस दबल्याने त्यांच्या मेंदूत काळे स्पॉट दिसले. यावर देखील उपचार केले गेले.

मात्र आता डॉक्टरांनी एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे सर्वच कुटुंबीय मोठ्या दुःखात आहेत. राजू श्रीवास्तव याचा मेंदू पूर्णतः बंद झाला आहे. डॉक्टरांनी ब्रेन डेड झाल्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांचे हृदय देखील खूप कमकुवत झाले आहे. यामुळे हृदयाचे ठोके नीट पडत नाहीत. असे डॉक्टर म्हणाले. त्यांच्या शरीरात कमरे खाली पाया पर्यंत जीव आहे.

त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर ठेवले आहे. यामुळे डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी आणखी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मेंदूला ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांचे डोक आणि तोंडाचा भाग काळा पडत चालला आहे. या अपडेटमुळे आता सर्व जण मोठ्या चिंतेत आहेत. राजू श्रीवास्तव यांचा जीव वाचवा यासाठी सर्व चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत. मात्र त्यांच्यात काहीच बदल होत नसल्याने चिंता अधिक वाढत चालली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *