खुशखबर! या तारखेला होणार पुष्पा – 2 रिलीज; रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण

मुंबई | रश्मीका मंदाना आणि अल्लु अर्जुन अभिनित पुष्पा हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाने आणि त्यातील मै झुकेगा नही साला या डायलॉगने सोशल मीडियावर चांगलीच हवा केली. अशात आता पुष्पा २ या चित्रपटात संदर्भात आतापर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टी वाचल्या असतील. अनेक जण पुष्पा २ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर आता तुमची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

पुष्पाचा पहिला पार्ट सुपरहिट झाल्यानंतर आता ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमैर संधू यांनी याच्या दुसऱ्या पर्टच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लिहिला आहे की, ” पुष्पा २ हा चित्रपट 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.” म्हणजेच हा चित्रपट पाहण्यासाठी अजून एक वर्ष वाट पहावी लागणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर दिग्दर्शकांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुष्पा या चित्रपटातील चंदनाची लाकडे तसेच त्यांची तस्करी आणि ते लाकडे लपवण्याची पद्धत फार भन्नाट होती. अशात अल्लू अर्जुनचा म्हणजेच पुष्पाचा स्वॅग चाहत्यांच्या मनावर राज्य करून गेला. या चित्रपटातील गाणी देखील भरपूर हिट ठरली. समंथा रूथ प्रभू आणि अल्लू अर्जुनचे आयटम सॉंग आणि त्यातल्या डान्स स्टेप्स देखील खूप व्हायरल झाल्या. या चित्रपटाप्रमाणेच पुष्पा २ हा चित्रपट भन्नाट असेल अशी सर्व चहात्यांना अपेक्षा आहे.

अशात पुष्पा २ या चित्रपटाच्या कथेबाबत अशी चर्चा रंगली आहे की, या चित्रपटामध्ये श्रीवल्ली आणि पुष्पा हे दोघे वेगळे होणार आहेत. श्रीवल्ली पुष्पाला कायमची सोडून जाणार आहे. चित्रपटातील विलन श्रीवल्लीचा खून करताना दिसेल. त्यानंतर पुष्पा याचा बदला घेण्यासाठी त्याला मारेल.

पुष्पा या चित्रपटात श्रीवल्ली आणि पुष्पा ही जोडी अफलातून गाजली. प्रेक्षकांनी या जोडीला अक्षरशः डोक्यावर घेतलं. मात्र पार्ट २ मध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना तिचे खूप कमी सीन आहेत असं म्हटलं जात आहे. तसेच या चित्रपटात विजय सेतु पतीची एन्ट्री होणार आहे. तो यामध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसेल.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *